मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा

कबनूर: हबीब शेखदर्जी 

दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक बालिकेचे पदपूजन करून त्यांना औक्षण व खाऊ देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जीवन श्री विद्या मंदिर, खोतवाडी येथील अध्यापिका सौ. रेखा संपत पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात विविध उदाहरणांच्या माध्यमातून बालिकांना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शीतलकुमार मणेरे, सचिव मा. श्री. अनिलकुमार मणेरे तसेच उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे, समन्वयक मा. श्री. अशोक वसगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु. संगीता कुंभार यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.