वस्त्र नगरी इचलकरंजीत नंदिनी कांबळे हिचे जल्लोषात स्वागत
इचलकरंजी : विजय मकोटे
दि:४ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही जिद्द व चिकाटीच्या बळावर येथील रेणुकानगर झोपडपट्टीतील आचारी शशिकांत कांबळे (बापू वस्ताद) यांची मुलगी नंदिनी कांबळे हिने प्यारा मिलिटरी आयटीबीपी पोस्ट टीजीडी बीटीसी हरियाणा येथे प्रशिक्षण पूर्ण केले. या यशाबद्दल नंदिनीचा भागातील नागरिकांच्या वतीने शिक्षण सभापती मनोज साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रेणुकानगर झोपडपट्टीत राहणारे शशिकांत कांबळे हे आचारी काम करतात. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी मुलगी नंदिनी हिला शिक्षणात काही कमी पडू दिले नाही. तर नंदिनी हिने उराशी ध्येय बाळगत जिद्द, आणि चिकाटीच्या जोरावर उत्तुंग यश प्राप्त केले. हरियाणा येथे प्यारा मिलिटरी आयटीबीपी पोस्ट टीजीडी बीटीसी प्रशिक्षण पूर्ण करुन नंदिनी इचलकरंजीत आली. भागातील नागरिक आणि शिक्षण सभापती मनोज साळुंखे यांनी तिचे पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर नागरिकांच्यावतीने नंदिनी हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पापा वस्ताद, शिवाजी शिंदे, सौ. नागूबाई लोंढे, सौ. मालन कांबळे, राहुल मोरे, सचिन नेसूर, दिपक वाघमारे, प्रशांत सांगा, दत्ता चातुर त्याचबरोबर रेणुकानगर झोपडपट्टी, धारवट झोपडपट्टी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.