मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ संस्थेची निवडणूक बिनविरोध
चेअरमनदी प्रकाश दत्तवाडे तर व्हा.चेअरमनपदी निवृत्ती गलगले
शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरु असलेल्या मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेने सातत्याने पारंपारिक हातमाग व्यवसायाला चालना देण्याचे काम केले आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विणकरांच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे. हातमाग संस्कृती जपण्याचे कार्य केले आहे. या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १३ जागांसाठी तितकेच अर्ज आल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. नरुटे यांनी काम पाहिले. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उज्वला पळसकर यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी निवृत्ती गलगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.