रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोलीस बँडसह मानवंदना

संगमेश्वर:सचिन पाटोळे

दि.१६: ३६९ व्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास रत्नागिरी पोलीस दलातर्फे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

दि. १४ मे २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना सादर करत संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांना अभिवादन केले.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पोलीस बँड पथकासह संभाजी महाराज जयंतीनिमित्त औपचारिक मानवंदना देण्यात आल्याने उपस्थितांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.