डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि १६ः येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग, अर्टिफिशियल इंटेलिजन्स अँण्ड मशिन लर्निंग तसेच अर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स विभागातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर या तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.मॅक्सीमस इन्फोवेअर ही ऑटोमेटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टीम्स, पॉवरट्रेन कंट्रोलर्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान तसेच अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली विकसित करणारी अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे. नाविण्यपूर्ण संशोधन, उच्च दर्जाचे अभियांत्रिकी उपाय आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेमुळे कंपनीने अ‍ॅटोमोबाईल आणि ई मोबिलिटी क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे.
या कॅम्पस इंटरव्हयूवमधून डीकेटीईच्या कॉम्प्युटर विभागातून २२, एआयएमएल विभागातून ६ तर एआयडीएस इंजिनिअरींग विभागातून ३ अशा एकूण ३१ विद्यार्थ्यांना मॅक्सीमस इन्फोवेअर या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेवून डीकेटीईमध्ये उद्योगाभिमुख शिक्षणावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक तंत्रज्ञान, प्रोग्रॅमिंग, कृत्रिम बुध्दिमता आणि डेटा सायन्स याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. तसेच तांत्रिकज्ञानाबरोबर संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकासासाठी नियमित प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची उत्तम संधी मिळत असून डीकेटीईचे विद्यार्थी उद्योगविश्‍वात यशस्वीपणे आपले स्थान निर्माण करीत आहेत.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.एस.के.शिरगावे, डॉ डी.व्ही. कोदवडे, डॉ टी.आय बागबान टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.