परभणी येथे होणाऱ्या 68 व्या वरिष्ठ महिला गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाची घोषणा

इचलकरंजी: विजय मकोटे

दि२३डिंसेबर परभणी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघातील खेळाडूंची निवड चाचणी झाली . त्यामधून प्रतीक्षा पिसे, संगीता माळी, पूजा जोशिलकर, शीतल पाटील, स्मिता शिंदे, गोपिका झाळके, सृष्टी कुंभार, साक्षी कवठेकर, मृणाली टोणपे ,तेजस्विता नार्वेकर, स्नेहा शिंदे ,आरती पाटील यांची परभणी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली

या संघाला प्रशिक्षक म्हणून कृष्णात माने व संघाची कर्णधार म्हणून मृणाली टोणपे हिची निवड करण्यात आली आहे. संघ निवडण्यासाठी निवड समिती मध्ये सदस्य डॉ. बाबासाहेब उलपे ,प्रा. शेखर शहा व कृष्णात माने होते.

या संघास जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री धनंजय महाडिकसौ ,कार्याध्यक्ष डॉक्टर रमेश भेंडीगिरी, सहकार्यवाह संभाजी पाटील, खजिनदार अण्णासो गावडे , भगवान पवार ,अजित पाटील, शेखर शहा यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.