नगरपालिका शाळा डिजिटल कामाचा र९ रोजीशुभारंभ

शिक्षण सभापती मनोज साळुखे यांची माहीती

इचलकरंजी: विजय मेकोटे
दि : २९ डिंसेबर    इचलकरंजी नगरपरिषदेच्या आनंदीबाई कर्वे शाळा नं. 10 आणि शाहीर अमर शेख शाळा नं. 56 येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून मंजूर पहिल्या टप्प्यातील नगरपालिका शाळा डिजिटल कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. बुधवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी दिली.
इचलकरंजी नगरपरिषद शिक्षण मंडळाकडील प्राथमिक शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह काळानुरुप येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण सभापती मनोज साळुंखे यांनीही पाठपुरावा केला. त्यानुसार खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून दिल्लीच्या धर्तीवर या शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार माने यांनी केंद्र शासनाकडून निधी मंजूर करुन आणला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गावभागातील आनंदीबाई कर्वे विद्या मंदिर शाळा नं. 10 आणि शाहिर अमर शेख विद्या मंदिर शाळा नं. 56 मध्ये शाळा डिजिटल कामाचे उद्घाटन होत आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आमदार अशोकराव जांभळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यासह वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके, रविंद्र माने, राहुल खंजिरे, सुनिल पाटील, विठ्ठल चोपडे, प्रकाश मोरबाळे, अजितमामा जाधव, शशांक बावचकर, सौ. उमा गौड, संजय कांबळे, मधुकर झोरे यांच्यासह विविध समित्यांचे सभापती व मान्यवर उपस्थित असणार आहेत, असेही शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.