चिपळुण तालुक्यातील कुशिवडे गावात भागोजी डिके परिवाराचा देहदान करण्याचा संकल्प
चिपळूण: सचिन पाटोळे
दि .१७ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील कुशिवडे गावातील रहिवासी भागोजी बुधाजी डिके व गंगाबाई भागोजी डिके यांचे लग्न दि. १९ फेब्रुवारी, १९६२ रोजी झाले. त्यांच्या लग्नाच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्यासह कुटूंबातील सर्वच सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे.
भागोजी बुधाजी डिके यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.
या आयोजनात त्यांचे चिरंजीव विलास भागोजी डिके व विकास भागोजी डिके यांचे योगदान फार मोलाचे आहे.
हा संकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी श्रमिक कृषी संवर्धन संस्था व मा. विलासजी होडे स्मृती वाचनालय यांच्या वतीने आगळावेगळा उपक्रम या संस्थेने हाती घेतला आहे.
माणूस जिवंत असेपर्यंत तो किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्त्व आहे. जिवंत असे पर्यंत कोणाच्या उपयोगी आला नसला तरी मृत्यूही उपयोगी पडू शकतो. नाहीतरी मेल्यानंतर आपले शरीर जाळले जाते. हे शरीर जाण्यासाठी सरासरी ८० मण लाकूड लागते. म्हणजेच एक मृतदेह जाळण्यासाठी एवढ्या संपत्तीचे नुकसान होते म्हणजेच देशातील किती संपत्तीचे नुकसान व प्रदूषण होऊन पर्यावरणाचाही र्हास होतो याची कल्पना करता येऊ शकत नाही. म्हणून हे शरीर न जाळता वैद्यकिय महाविद्यालयाला दान केले तर त्या शरीरातील काही अवयव जिवंत माणसाला उपयोगी पडतील व त्याचे जीवन सार्थकी लागेल. ‘देहदान ही एक काळाची गरज आहे’ म्हणून या उद्देशाने संस्थेने देहदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर जलनायक व सामाजिक कार्यकर्ते मा.युयूत्सु आर्ते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच *वालावालकर रुग्णालय डेरवणची वैद्यकिय टिम व प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे च्या वैद्यकिय अधिकारी डॉ.पूनम राणिम या उपस्थित राहणार आहेत. तरी देहदानाबद्दल ज्या लोकांना माहिती घ्यायची असेल किंवा देहदान, अवयवदान व नेत्रदान करायचे असेल तर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती विलास होडे यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.