मणेरे शिक्षण संकुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कबनूर : दिपक पार्टiल
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरेहायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्यासंयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसाजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापकमा.श्री.सुधाकररावजी मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे हे उपस्थित होते. मा.श्री.सुधाकररावजी मणेरे यांनी छत्रपतींच्या फोटोचे पूजन केले. तसेच शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी प्रेरणामंत्र, पोवाडा, कविता व भाषणे सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीम. दिपा जोलापुरे यांनी केले.सदर कार्यक्रमास प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. तसलिम मणेर, उपमुख्याध्यापिकासौ. पुष्पा ऐनापुरे, कॉलेज प्राचार्या सौ.उर्मिला माने ,इनचार्ज श्री.मलिक मणेर तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.