गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर: सौ रेणूताई पोवार

दि१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी), संचालकसो व अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करण्‍यात आले.

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी विविध माध्यमातून सामजिक, सार्वजनिक, राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिव विचारच मार्गदर्शक ठरत आहेत. गोकुळ परीवातील सर्वांनी महाराजांचे आचार -विचार आचरणात आणावेत यामुळे संस्था बळकटीकरणास नक्कीच मदत होईल.असे मनोगत गोकुळचे चेअरमन श्री.विश्वास पाटील यांनी शिवजयंती निमित्त संघाच्या ता.पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी मनोगत संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, व संचालक अजित नरके यांनी केले व आभार संकलन सहा.व्‍यवस्‍थापक बी.आर.पाटील यांनी मानले, सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले. व

यावेळी संघाचे चेअरमन मा. श्री. विश्वास पाटील,विभागीय उप.आयुक्‍त राज्‍य उत्‍पादन शुल्‍क कोल्‍हापूर यशवंत पवार, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, अंबरिषसिंह घाटगे, डेअरी व्‍यवस्‍थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही.मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍‍ही. तुरंबेकर व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.