युनेस्को व आयएनसीसीयुच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट प्रथम
ई-टॉयलेट संकल्पना : क्लिन वॉटर अॅण्ड सॅनिटेशन श्रेणी
यड्राव: प्रतिनिधी
दि.24 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले सेल्फ सस्टेन्ड ई-टॉलेट युजिंग आयओटी विथ स्वेअज वॉटर ट्रिटमेंट हा प्रोजेक्ट आतंरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (युनेस्को) व भारतीय राष्ट्रीय युनेस्को सहयोगिता आयोग (INCCU) यांच्या सहकार्यातून VISAI-2022 हि 12 वी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केली होती.
देशभरातून अतिंम फेरीत क्लिन वॉटर अॅण्ड सॅनिटेशन श्रेणीत 15 विद्यापीठातून 54 प्रोजेक्ट निवड झाले होते. त्यातून शरद इन्स्टिट्युटच्या ई-टॉलेट या प्रोजेक्टने प्रथम पटकाविला. इलेक्टॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या वैष्णवी पारीक, सोनिया कुंबळे, मृणाल पाटील, अपेक्षा हुद्दार, तनजिला कुडचीकर, स्नेहल ठोंमके, अंकिता माळी, अनुप्रिया तिपन्नावर या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट केला आहे.
सार्वजनिक टॉयलेट यांची स्वच्छतेची समस्या लक्षात घेवून टॉयलेट ऑटोमेटीक क्लिनिंग करण्यात येते. त्यामध्ये आयओटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वॉटर ट्रिटमेंट प्लॅट उभारला आहे. त्यामुळे सांडपाण्याचे रुपांतर स्वच्छ पाण्यामध्ये होते. हे पाणी शेती व इतर वापरासाठी उपयोगी होते.
शरद पॅटर्नमध्ये प्रोजेक्ट बेसड लर्निंगला अत्यंत महत्व आहे. विद्यार्थ्यांकडून प्रथमवर्षापासून प्रोजेक्ट करुन घेतले जातात. इंडस्ट्री, समाजातील समस्यांवर संशोधन करुन विद्यार्थी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट निर्माण करीत आहेत. ज्याचा मोठा उपयोग इंडस्ट्री, समाजाला होत आहे.
विद्यार्थ्यांनी मिरज-कुपवाड येथील इलेक्ट्रोड्रीम टेक इंडिया या कंपनी अंतर्गत हा प्रोजेक्ट केला आहे. या प्रोजेक्टसाठी डॉ. एस.एस. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.