पाणी प्रश्नी शासनाकडून लागेल ती मदत निश्‍चितपणे मिळवून देऊ

आमदार आवाडे यांची ग्वाही

इचलकरंजी विजय मकोटे
दि. २५ इचलकरंजी शहराला भेडसावणार्‍या बहुचर्चित पाणी प्रश्‍नासंदर्भात शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जोपर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत नागरिकांकडून पाणीपट्टी घेण्यात येऊ नये असे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कृष्णा नळपाणी पुरवठा योजना मुख्य जलवाहिनी बदलासह पंचगंगा नदीतून उपसा करण्यात येणार्‍या अडचणीबाबत सविस्तर अहवाल द्यावा. त्या संदर्भात शासनाकडून लागेल ती मदत निश्‍चितपणे मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सुळकूड योजना ही निश्‍चितपणे होणार असून ती आपणच पूर्णत्वास नेणार आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे विरोध होत असून इचलकरंजीच्या योजनेसाठी कोणाच्याही वाट्याचे पाणी हिरावून घेतले जाणार नसल्याचे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षभरापासून शहरातील पाणी पुरवठा पूर्णत: कोलमडला आहे. कृष्णा योजना गळतीमुळे आणि पंचगंगा प्रदुषणामुळे पाणी पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. आठवड्यातून एकदा पाणी मिळत असल्याने नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी नगरपालिकेत येऊन पाणी प्रश्‍नी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जलअभियंता सुभाष देशपांडे, अंकिता मोहिते, बाजी कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार आवाडे यांनी प्रथमत: नागरिकांना शुध्द व मुबलक पाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर 100 शुध्द पेयजल प्रकल्पाचे काय झाले? ते सुरु का होत नाहीत असा सवाल करत जर योजना पूर्ण होणार नसतील तर त्यासाठीचा निधी परत जाण्यासह भविष्यात राज्य शासनाकडून नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही असे सांगितले. त्यावर जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी 100 पैकी 77 शेड तयार असून 46 ठिकाणी मशिनरी बसविण्यात आल्याचे सांगितले. पण त्यावर समाधान न झाल्याने आमदार आवाडे यांनी योजनेसाठी आवश्यक निधी आणून दिला असतानाही दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निधी मिळूनही त्याचा वेळेत विनियोग होत नसले तर सदरचा निधी परत जावून शासनाकडून पुन्हा निधी मिळणार नाही, असे सांगितले. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास मक्तेदार चालढकल करत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासह ब्लॅकलिस्ट करावे, असेही सुनावले. पाणीटंचाईमुळे जनतेच्या असंतोषाचा कधी उद्रेक कधी होईल हे सांगता येणार नाही. पाण्याचा हा प्रश्‍न आंदोलनातून अथवा वाद करुन सुटणार नसून सर्वांनी मिळून प्रयत्नातून तो सोडवूया असेही आमदार आवाडे म्हणाले.
कट्टीमोळ डोह येथे नदीपात्राची खोली अत्यंत कमी असल्याने त्याठिकाणी सोडलेल्या मोटारी जळाल्यामुळे योजनेचे काम थांबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर आमदार आवाडे यांनी नदीपात्रातील गाळ काढण्याची गरज व्यक्त करत लोकसहभागातून गाळइचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजी शहराला भेडसावणार्‍या बहुचर्चित पाणी प्रश्‍नासंदर्भात शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जोपर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत नागरिकांकडून पाणीपट्टी घेण्यात येऊ नये असे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कृष्णा नळपाणी पुरवठा योजना मुख्य जलवाहिनी बदलासह पंचगंगा नदीतून उपसा करण्यात येणार्‍या अडचणीबाबत सविस्तर अहवाल द्यावा. त्या संदर्भात शासनाकडून लागेल ती मदत निश्‍चितपणे मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सुळकूड योजना ही निश्‍चितपणे होणार असून ती आपणच पूर्णत्वास नेणार आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे विरोध होत असून इचलकरंजीच्या योजनेसाठी कोणाच्याही वाट्याचे पाणी हिरावून घेतले जाणार नसल्याचे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षभरापासून शहरातील पाणी पुरवठा पूर्णत: कोलमडला आहे. कृष्णा योजना गळतीमुळे आणि पंचगंगा प्रदुषणामुळे पाणी पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. आठवड्यातून एकदा पाणी मिळत असल्याने नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी नगरपालिकेत येऊन पाणी प्रश्‍नी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जलअभियंता सुभाष देशपांडे, अंकिता मोहिते, बाजी कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार आवाडे यांनी प्रथमत: नागरिकांना शुध्द व मुबलक पाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर 100 शुध्द पेयजल प्रकल्पाचे काय झाले? ते सुरु का होत नाहीत असा सवाल करत जर योजना पूर्ण होणार नसतील तर त्यासाठीचा निधी परत जाण्यासह भविष्यात राज्य शासनाकडून नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही असे सांगितले. त्यावर जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी 100 पैकी 77 शेड तयार असून 46 ठिकाणी मशिनरी बसविण्यात आल्याचे सांगितले. पण त्यावर समाधान न झाल्याने आमदार आवाडे यांनी योजनेसाठी आवश्यक निधी आणून दिला असतानाही दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निधी मिळूनही त्याचा वेळेत विनियोग होत नसले तर सदरचा निधी परत जावून शासनाकडून पुन्हा निधी मिळणार नाही, असे सांगितले. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास मक्तेदार चालढकल करत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासह ब्लॅकलिस्ट करावे, असेही सुनावले. पाणीटंचाईमुळे जनतेच्या असंतोषाचा कधी उद्रेक कधी होईल हे सांगता येणार नाही. पाण्याचा हा प्रश्‍न आंदोलनातून अथवा वाद करुन सुटणार नसून सर्वांनी मिळून प्रयत्नातून तो सोडवूया असेही आमदार आवाडे म्हणाले.
कट्टीमोळ डोह येथे नदीपात्राची खोली अत्यंत कमी असल्याने त्याठिकाणी सोडलेल्या मोटारी जळाल्यामुळे योजनेचे काम थांबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर आमदार आवाडे यांनी नदीपात्रातील गाळ काढण्याची गरज व्यक्त करत लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहिम हाती घ्यावी. आणि नदीतून काढलेला गाळ ज्या शेतकर्‍यांना हवा असेल त्याला देण्यात यावा, असे सुचविले. त्याचबरोबर कृष्णा योजनेच्या 5 किलोमीटर जलवाहिनी बदलासाठी आवश्यक निधीचा तपशिल द्यावा. तसेच पंचगंगा नदीतून उपसा करण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणींची माहिती द्यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी शासन स्तरावरुन आपण आणून देऊ, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
यावेळी ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, सर्जेराव पाटील, एम. के. कांबळे, संजय केंगार, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, नितेश पोवार, श्रीकांत टेके, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, राहुल घाट, कपिल शेटके, राजू देसाई, राजाराम बोंगार्डे, स्वप्निल कुळवमोडे, वसंत येटाळे, प्रा. शेखर शहा, सौ. ध्रुवती दळवाई आदी उपस्थित होते. काढण्याची मोहिम हाती घ्यावी. आणि नदीतून काढलेला गाळ ज्या शेतकर्‍यांना हवा असेल त्याला देण्यात यावा, असे सुचविले. त्याचबरोबर कृष्णा योजनेच्या 5 किलोमीटर जलवाहिनी बदलासाठी आवश्यक निधीचा तपशिल द्यावा. तसेच पंचगंगा नदीतून उपसा करण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणींची माहिती द्यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी शासन स्तरावरुन आपण आणून देऊ, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
यावेळी ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, सर्जेराव पाटील, एम. के. कांबळे, संजय केंगार, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, नितेश पोवार, श्रीकांत टेके, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, राहुल घाट, कपिल शेटके, राजू देसाई, राजाराम बोंगार्डे, स्वप्निल कुळवमोडे, वसंत येटाळे, प्रा. शेखर शहा, सौ. ध्रुवती दळवाई आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.