अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

मुंबई:प्रतिनिधी –
दि. १२ एप्रिल मुंबई पोलिस निर्भया पथकासाठी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘निर्भया बनुया’ या गीताचे लेखन केल्याबद्दल मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वतीने अरुण काशीद यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.इचलकरंजीचे सुपुत्र पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे हे विविध सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित असतात. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई पोलिस निर्भया पथकावर आधारित प्रबोधनपर गाणे तयार करण्याचा निर्णय श्री. काणे यांनी घेतला होता. त्याला अनुसरून ‘निर्भया बनुया’ हे गीत तयार करण्यात आले. या गिताचे लेखन अरुण काशीद यांनी केले. संकल्पना आणि रचना राजेंद्र काणे यांची आहे. तर दिग्दर्शन राहुल खंदारे यांनी केले आहे. नामवंत गायिका वैशाली सामंत यांनी स्वरसाज चढवला असून निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे. चित्रीकरण पार्थ चव्हाण यांनी केले आहे.

विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिवाजी नार्वेकर यांच्या हस्ते आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या उपस्थितीत अरुण काशीद यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ए. के. प्रॉडकॅशनचे कॅमेरामन विक्रम खांडेकर, उद्योगपती धनराज खंडेलवाल, रामभाऊ जोगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.