अपूर्व उत्सहात अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.22 जिल्हा प्रशासन , रगेडियन स्पोर्ट्स क्लब व कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने ‘ छ . शाहू स्मृती शताब्दीनिमित्त ‘अल्ट्रा रन’ मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पोलीस ग्राउंड येथे झेंडा दाखवून उद्घाटन केले .
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले , या स्पर्धेत सुमारे ३ हजाराहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून .या स्पर्धेद्वारे ‘सदृढ कोल्हापूर – निरोगी कोल्हापूर ‘ ही ओळख जगात निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून, प्रत्येक कोल्हापूरकराने फिटनेसकडे लक्ष दयावे असा आशावाद व्यक्त केला.
स्त्री आणि पुरुष गटात ही स्पर्धा घेण्यात आली आहे , स्पर्धकासाठी 5,10,21,42 आणि 50 किमी इतक्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ही रनिंग स्पर्धा घेण्यात आली आहे . शाहूं महाराजांचे मल्लविद्या ,मल्लखांब या मर्दानी खेळाबद्दल असणारे प्रेम तसेच सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्व , महाराष्टातील खेळाडूंसह बाहेरील राज्यातून येणाऱ्या खेळाडूंना या निमित्ताने अनुभवता येईल .शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देणाऱ्या शाहूंच्या विचारांचा संदेश या निमित्ताने संपूर्ण भारतात पोहचेल.
ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना पदक (मेडल ) देवून आणि विजेत्या खेळाडूंना स्मृतीचिन्ह ( ट्राफी ) देवून गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी योगेश जाधव , ध्रुव मोहिते , विश्वजय खानविलकर , फुटबॉलपटू अनिकेत जाधव आदी उपस्थित होते .या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुढारी टोमॅटो एफ एम ,एस जे आर टायर्स ,आणि वायू डाईन टेक अप यांचे सहकार्य लाभले .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.