सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान

इचलकरंजीविजय मकोटे
दि. १५ मे. :फलटण संस्थानकडून संस्कृती व शिक्षणाचा ठेवा जोपासण्याचे काम केले जात आहे. भविष्याचा वेध घेत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या दूरदृष्टीकोनातून सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार जगन्नाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करुन खर्‍या अर्थाने पुरस्काराचा गौरव करण्यात आला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने जवाहर सहकारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे तसेच अखिल भारतीय केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांना यंदाचा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात नामदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.
प्रारंभी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी करून दिला. यावेळी आमदार दीपक चव्हाण तसेच सत्कारमूर्ती आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची माहिती विषद केली. सहकार चळवळीतून उभारलेल्या सहकारी संस्थांच्या उभारणीचा इतिहास मांडला. प्रगतीशील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्य जाणार्‍या इचलकरंजीच्या सर्वांगिण खासदार कै. दत्ताजीराव कदम तसेच विविध मान्यवरांसोबत आवाडेदादांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर मागील 15 वर्षापासून यशस्वीपणे सुरु असलेल्या श्रीराम साखर कारखान्यात येत्या दोन वर्षात प्रतिदिन 5 हजार मे.टन गाळप आणि डिस्टलरी प्रकल्पाची प्रतिदिन 30 हजार लिटरची क्षमता 45 हजार लिटर करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती निवडण्याचे काम कठीण आहे. मात्र सहकाराच्या माध्यमातून कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उभारलेले विकासाचे पर्व आणि औषध क्षेत्रात जगन्नाथ शिंदे यांनी केलेले कार्य निश्‍चितच कौतुकास्पद आहे. वस्त्रनगरीला आधुनिकतेच्या वळणावर नेण्यासह तेथील संस्कृती टिकवण्याचे काम आजही आवाडेदादांच्याकडून अविरतपणे केले जात आहे. समाजाप्रती स्वत:ला वाहून घेण्याचे काम या दोन्ही व्यक्तींनी केल्याचे नमुद करत त्यांनी अशा व्यक्तींनी भविष्याचा वेध घेत केलेल्या कामामुळेच पश्‍चिम महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रभागी असल्याचे सांगितले. सहकारातील श्रीराम कारखाना सुरु करुन आवाडे कुटुंबिय हे देवदूत ठरले आहेत. एकाने कारखाना वाचविला तर एकाने कोरोना काळात तारले असा आवाडे व शिंदे यांचा उल्लेख करत आवाडेदादा, प्रकाशआण्णा व जगन्नाथ शिंदे आप्पा यांच्यात माणुसकीचे खरे दर्शन दिसून येत असल्याचे सांगितले.
प्रारंभी मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. स्वागतगीतानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीमंती मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे, श्रीमंत लक्ष्मीदेवी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांजे पुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवांजली नाईक निंबाळकर, सौ. योगिनी पोकळे, सौ. निवेदिता नाईक-निंबाळकर फलटण पंचायत समिती सभापती विश्‍वजीतराजे नाईक-निंबाळकर, शिरीष देशपांडे, सुभाष शिंदे, श्रीराम-जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, राजेंद्र लड्डा, जवाहर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, विद्यमान व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, विलास गाताडे, जिनगोंडा पाटील, आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभय काश्मिरे, संजयकुमार कोथळी, सुमेरु पाटील, शितल आमण्णावर, गौतम इंगळे, विजय कुंभोजे, शेखर पाटील, प्रकाशराव सातपुते सुरज बेडगे, बाबासाहेब पाटील, नंदू पाटील सर्जेराव पाटील, महावीर कुरुंदवाडे, एम. के. कांबळे, शेती अधिकारी किरण कांबळे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सतिश कोष्टी, सुभाष गोटखिंडे, राहुल घाट, दत्तात्रय कनोजे, रफिक खानापुरे, शांतिनाथ बेडक्याळे, तौफिक मुजावर, प्रकाश चौगुले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.