जागतिक योग दिनानिमीत्‍य गोकुळ मध्ये योग दिन साजरा

कोल्‍हापूर: प्रतिनिधी

दि..२२ जून. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने जागतीक योग दिनानिमीत्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्‍या उपस्थित योग दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी योग प्रशिक्षिका सौ.अनुराधा महादेव ढवळे यांनी योगाचे महत्‍व पटवून देवून प्रात्‍यक्षिके करुनदाखवलीत.

यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि दैनंदिन कामाच्‍या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही. कामाचा व्‍याप पैश्‍यामागची धडपड किंवा यश,कीर्ती इत्‍यादी मध्‍ये आरोग्‍य रक्षण होवूनही दीर्घायुष्‍य हा भाग चिंतनीय आहे. आरोग्‍य टिकणा-या प्रचलित प्रणालीतही विविधांगी विचार करुनही माणूस माञ सुखायू किंवा दीर्घायू होऊ शकलेला नाही हे सत्‍य आहे. त्‍याकरीता योग हा सध्‍याच्‍या धावपळीच्‍या जगात एकमेव उपाय आहे.नियमित योगामुळे शरीर निरोगी राहते. निरोगी शरीरामध्‍ये आनंदी मन राहते. यामुळे नित्‍य नियमाने योगासने करणे हे  आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे असे म्‍हणाले.

यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची प्रात्‍यक्षिके,उदा.सर्वांगासन,पादान्‍गुष्‍टासन, शशिकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीतनौकासन, पर्वतासन, ताडासन इ.आसने श्री. पाटील यांनी कर्मचा-यांसमोर सादर करुन सदरची योगासने कर्मचा-यांकडून करवून घेतली आणि ही आसने नित्‍यनियमाने सर्व कर्मचा-यांनी करावीत असे आव्‍हानही त्‍यांनी केले.

 सदर कार्यक्रमाचे दीपप्रज्‍वलन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्‍ते व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले,संभाजी पाटील,प्रकाश पाटील, बयाजी शेळके,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांचे उपस्थितीत करण्‍यात आले या कार्यक्रमाचे सूञ संचालन श्री.एम.पी.पाटील यांनी केले.

याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील(आबाजी),जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले,संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी,संकलन व्यवस्थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, पशुसंवर्धन सहा.व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंखे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संकलन सहा.व्यवस्थापक बी.आर.पाटील व संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.