संजय घोडावत विद्यापीठाच्या युवराज जाधव यास आशियायी शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

हातकणंगले : अब्दुल नदाफ

दि. २० जुलै : मालदिप येथे झालेल्या मालदीव बॉडी बिल्डिंग असोसिएशन, मिनिस्ट्री ऑफ युथ, स्पोर्टस अँड कम्युनिटी, मालदीव प्रजासत्ताक आणि मालदीव ऑलिम्पिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आशियायी शरीरसौष्ठव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेत अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या युवराज प्रकाश जाधव याने रौप्यपदक पटकाविले. 
या स्पर्धेसाठी त्याला प्रशिक्षक राजेश वडम यांचे मॉलचे मार्गदर्शन लाभले.
युवराज जाधव हा इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन, मुंबई चा स्टार ऍथलेट आहे. त्याने या आधी विविध राष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली आहेत.
त्याच्या या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.