तिरंगा ध्वजाच्या तीन रंगातील 750 फुगे आकाशात सोडले
क्षणभर झाले नभ तिरंगामय
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १४ ऑगस्ट :देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत डीकेटीई सोसायटीच्या नारायण मळा मराठी मिडीयम प्रशालेत तिरंगा ध्वजाच्या तीन रंगातील 750 फुगे आकाशात सोडण्यात आले. यामुळे काही क्षण संपूर्ण नभ तिरंगामय होऊन गेले.केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे या अभियानाची जनजागृती व प्रबोधनासाठी डीकेटीई सोसायटीच्या नारायण मळा मराठीदेश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत डीकेटीई सोसायटीच्या नारायण मळा मराठी मिडीयम प्रशालेत तिरंगा ध्वजाच्या तीन रंगातील 750 फुगे आकाशात सोडण्यात आले. यामुळे काही क्षण संपूर्ण नभ तिरंगामय होऊन गेले.
या उपक्रमाचा शुभारंभ आदित्य आवाडे, माजी विद्यार्थीनी वेदांती हेरवाडे यांच्या हस्ते आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गाडेकर, प्राथमिक विद्या मंदिर मुख्याध्यापिका कु. उज्वला पाटील, बालवाडी विभागप्रमुख सौ. वैशाली पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ध्वजसंहितेनुसार प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन आदित्य आवाडे यांनी केले. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमाचा उत्स्फूर्तपणे आनंद लुटला.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे क्रीडाशिक्षक संभाजी बंडगर, संगित शिक्षक श्रीधर पाटील, अभिजित बचाटे, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मानसी देवमोरे, सौ. स्वाती काकडे व विद्यार्थ्यांनी कु. आसमा अत्तार यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.