डीकेटीईच्या प्रा.सागर जावळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

इचलकरंजी : विजय मकोटे

दि०५ सप्टेंबर येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागात कार्यरत असणारे प्रा.सागर नौ. जावळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत ‘पीएच.डी. इन टेक्स्टाईल इंजिनिअरींग’ ही पदवी प्राप्त झाली आहे.  प्रा.सागर जावळे हे गेली १८ वर्षापासून टेक्स्टाईल विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  
त्यांनी ‘कॅरेक्टरायझेशन ऑफ सुटींग फॅब्रीक्स प्रोडयुसड बाय रिंग अ‍ॅन्ड कॉम्पॅक्ट यार्नस’ या विषयावर प्रा.डॉ.आर.एन.जोशी, डीन, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट, श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पी.एच.डी. प्रबंधक पूर्ण केला आहे.
सुटींग फॅब्रिक्स हे मुख्यतः रिंग किंवा कॉम्पॅक्ट यार्न पासून बनविले जातात.  रिंग यार्न पासून बनविलेल्या सुटींग फॅब्रिक्समध्ये उत्तम प्रतीचे कंफर्ट गुणधर्म असतात तर कॉम्पॅक्ट यार्न पासून बनविलेल्या सुटींग फॅब्रिक्स मध्ये उत्तम प्रतीचे टेन्साईल गुणधर्म असतात. तथापि, सुटींग फॅब्रिक्ससाठी उत्तम प्रतिचे टेन्साईल सह कंफर्ट गुणधर्माची सुध्दा गरज असते म्हणून या संशोधनामध्ये सुटींग फॅब्रिक हे हायब्रीड डबल यार्न (रिंग व कॉम्पॅक्ट यार्नचे डबलिंग) पासून बनविले आहे, ज्यामुळे सुटींग फॅब्रिकसाठी आवश्यक असणारे उत्तम प्रतिचे टेन्साईल व कंफर्ट गुणधर्म सुटींग फॅब्रिकला प्राप्त झालेले दिसून आले. या संशोधन कार्यात, धागा ते वस्त्रनिर्मितीसाठी संस्थेचे संचालक प्रा डॉ पी.व्ही. कडोले व उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
सदरचे संशोधन हे एक नाविण्यपूर्ण संशोधन आहे आणि या संशोधनावर आधारित ‘अ मेथड ऑफ मेकिंग हायब्रिड व्होअन फॅब्रिक फॉर सुटींग’ या विषयावर पेटेंट फाईल केलेले आहे आणि नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये विविध पेपर सुध्दा प्रकाशित झालेले आहेत.
पीएच.डी. डिग्री पूर्ण झालेबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे यांनी प्रा.सागर जावळे यांचा सत्कार केला यावेळी डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले व प्रा. डॉ यु.जे.पाटील उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.