शरद कृषीच्या विद्यार्थ्याचे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश

जयसिंगपूर :प्रतिनिधी 

दि २ जानेवारी :जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धेत
यश संपादन केले. स्पर्धेत आंतर महाविद्यालय कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धा
मिरजगांव येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये शरद कृषीच्या खेळाडूनी वजन उचलणे या प्रकारात कु. मोहमदतय्यब जमादार
यांने ६१ किलो वजनी गटात १८० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक व कु. आरमान कुरणे याने
१०९ + किलो गटात ८५ किलो वजन उचलून तृतीय क्रमांक मिळवला. कु. अमोल भंडारे याने
शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ८५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल
बागणे यांनी या खेळाडूचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.