डीकेटीईच्या प्रा.डॉ.अश्‍विनी ए. रायबागी यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त

इचलकरंजी:हबीब  शेख दर्जी 

दि . २ जानेवारी :ˆ- डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील प्रा.डॉ.अश्‍विनी अनिल रायबागी यांनी प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ‘स्टडीज ऑन कंफर्ट ऍन्ड हॅन्डल कॅरॅक्टरस्ट्रीक्स ऑफ फॅब्रिक्स विथ एअरजेट टेक्स्टर्ड यार्नस्’ या विषयावर संशोधन केले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कडून त्यांना ‘पीएच.डी. इन टेक्स्टाईल इंजिनिअरींग’ ही पदवी प्राप्त झाली आहे.  प्रा.अश्‍विनी ए. रायबागी या टेक्स्टाईल विभागामध्ये गेली १३ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सदरचे संशोधन हे एक नाविण्यपूर्ण संशोधन आहे. प्रा.डॉ.अश्‍विनी ए रायबागी यांनी रीतसर विविध संशोधनात्मक पेपर याचा विस्तृतपणे अभ्यास  केला. पारंपारिक पध्दतीमध्ये कॉटन या नैसर्गिक तंतूपासून बनविलेले कापड हे वापरण्यास आरामदायी असे आहे. लोकसंख्या वाढीमुळे  कॉटन पिकविण्यासाठी लागणारी जागा अपूरी पडत चालली आहे व दिवसेंदिवस याचे भाव देखील वधारत आहेत.  याला पर्याय म्हणून प्रा.रायबागी यांनी पॉलिएस्टर व नॉयलॉन एअरजेट टेक्स्टर्ड यार्न यांचा वापर करुन विविध २७ फॅब्रिकची निर्मिती केली आहे. एअरजेट टेक्स्टर्ड यार्न फॅब्रिकच्या विविध गुणधर्मांच्या त्यांनी अत्याधुनिक मशिनरीवर चाचण्या घेतल्या. विशेषतः यांनी मेकॅनिकल प्रॉपर्टीज, अस्थेटीक कम्फर्ट, थर्मोफिजीऑलॉजीकल कम्फर्ट, व हॅन्डल प्रॉपर्टीज या सर्व गुणधर्माचा सखोल अभ्यास केला.  तसेच ‘डिझायरिबीलीटी इंडेक्स’ या संपूर्ण नवीन विषयावर देखील काम केले व टेक्स्टाईल इंडस्ट्रीजसाठी उपयोगी असणारे उत्कृष्ठ संशोधन कार्य केले आहे. या आधीही त्यांचे एअरजेट टेक्स्टर्ड यार्न फॅब्रिक या विषयावर लॅम्बर्ड ऍकॅडमिक पब्लिशिंग, जर्मनी येथे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांनी बी.ए. इन मास कम्युनिकेशन ऍन्ड जर्नलिझम या विषयावर पदवी संपादन केली आहे.  त्यांना रोटरी एन्स क्लब यांचेकडून देखील शैक्षणिक क्षेत्रामधील त्यांच्या कार्यासाठी दुर्गा स्त्री शक्ती पुरस्कार देवून २०२० साली सन्मानित करण्यात आले आहे.
पीएच.डी. डिग्री पूर्ण झालेबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव प्रा.डॉ.सौ.सपना आवाडे यांनी प्रा.अश्‍विनी रायबागी यांचा सत्कार केला असून प्र.डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे आणि डेप्युटी डायरेक्टर व टेक्स्टाईल विभागप्रमुख प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.