मुबई गोवा महामार्गाच्या  कामात अनेक त्रुटया

संगमेश्वर तालुका प्रेस क्लब चा जनआंदोलन छेडण्याचा इशारा

संगमेश्वर :सचिन पाटोळे 
दि ,१२ :  आरवली ते तलेकांटे दरम्यान सुरु असलेल्या  मुबई गोवा महामार्गाच्या  कामात अनेक त्रुटी असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे . हे कामही निकृष्ठ असल्याचे बोलले जात आहे . नवीन रस्ता अनेक ठिकाणी खचला असून रस्त्याला लेव्हल ही नसल्याचे दिसून येते . काम सुरू असताना वाहतुकीसाठी ठेवण्यात आलेले पर्यायी मार्ग हे सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराचे काम असताना मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे . या मार्गावरून प्रवास करताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे .याकडे तातडीने लक्ष घालून हे मार्ग दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा संगमेश्वर तालुका प्रेस क्लब चे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे .
मुबई गोवा महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे .यात काम सुरू असताना पाणी न मारल्याने होणारा धुळीचा त्रास, सुरक्षा उपायांची वानवा, निकृष्ठ काम अशा अनेक तक्रारीवरून महामार्ग ठेकेदार कायमच चर्चेत असल्याचे पहायला मिळते .याविरोधात जनआक्रोश समितीच्या वतीने संगमेश्वर येथे आंदोलन छेडण्यात आले होते . मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसेथे असल्याचे दिसून येते.
महमार्गाचे काम सुरू असताना पर्यायी वाहतुकीसाठी जे मार्ग बनविले जातात ते सुस्थितीत बनवणे ही ठेकेदारांची जबाबदारी असताना असे होताना दिसत नाही. आरवली ते तलेकांटे प्रवास करताना जवळ जवळ सर्वच पर्यायी मार्गाची दुरावस्था झाली आहे .या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकाना फार मोठा त्रास व नुकसान सोसावे लागत आहे .यामुळे अनेकवेळा अपघातही घडून येत आहेत . मात्र याकडे ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून चालढकल करत असल्याचे बोलले जात आहे.
अशा मार्गांची तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करून हे मार्ग प्रवासासाठी सुकर बनवावा अन्यथा लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा संगमेश्वर तालुका प्रेस क्लब चे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.