डीकेटीईचा खो खो संघ सर्वत्र विजयी
इचलकरंजी,:विजय मकोटे
दि. ०५ एप्रिलः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टियूटच्या खो खो संघाने इचलकरंजी ते मुंबई अशी विजयी घौडदौड केली आहे. इचलकरंजी येथील लीड कॉलेजची खो खो स्पर्धा नुकतीच जिंकणा-या मुलांच्या खो खो संघाने राष्ट्रीय स्तरावरील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे व आय.आय.टी.,मुंबई, खो खो स्पर्धा जिंकून विजयाची हॅट्रीक साधली आहे. यामुळे डीकेटीईच्या खो खो च्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आय.आय.टी मुंबई व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धेत डी.वाय.पाटील कॉलेज च्या संघावरती मात करीत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमाकांचे बक्षिस संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी डीकेटीईकडून वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येते यामुळेच येथील विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये विविध कला गुणांचे सादरीकरण करुण आपला ठसा अशा स्पर्धेमध्ये उमटवतात यामुळेच इचलकरंजी आणि डीकेटीईचे नांव अशा विविध स्पर्धेमध्ये सन्मानाने घेतले जाते.
विजयी खेळाडूंचे नांवे रोहित धामणे, उमेश लाटणे, चैतन्य माने, आदित्य बुक्का, अथर्व वडे, यश देसाई, प्रथमेश कोठावळे, तेजस सोनवणे, रविराज देसाई, शिवराज भोसले, सचिन चव्हाण, ॠत्विक फडतारे, वैभव पाटील, योगेश माळी आणि अथर्व शिरवळकर.
विजयी संघास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे खजिनदार प्रकाश दत्तवाडे, व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस संस्थेचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आर.डी. नाईकनवरे यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, डीन प्रा. एस. जी. कानिटकर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.