अद्यावत बँकिंग सुविधांसह यड्राव बँक मल्टीस्टेट करणार चेअरमन अजय पाटील यड्रावकर
यड्राव बॅंकेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:१५:जुलै:सहकाररत्न स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेली व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली यड्राव बँक, बँकेची व्यवसाय वृद्धी आणि विस्तार होण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील नव्या अद्यावत सेवा सुविधा ग्राहकाना देऊन यड्राव बँक लवकरच मल्टीस्टेट बँक करू असे उदगार बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, यड्राव को-ऑपरेटिव बँकेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या जयसिंगपूर येथील प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी संपन्न झाली
यावेळी ते बोलत होते, माजी नगराध्यक्ष आणि बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सदस्य अनिल बागणे, शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते,
सर्वप्रथम सहकाररत्न स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केले, अहवाल सालातील मृत झालेल्या बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, शहीद जवान यांना सभेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले, यावर उपस्थित सभासदानी विषय पत्रिकेवरील सर्व एक ते बारा विषयांना आवाजी मताने मंजुरी दिली, स्पर्धेच्या जगात बँक मोठी व्हायची असेल तर अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिकतेचा स्विकार करायला हवा, बँकेच्या ग्राहकांशी संवाद वाढवायला हवा यासाठी प्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करावे अशी भावना अनिल बागणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली, संजय पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना बँकेने 150 कोटीच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले असून जवळपास 250 कोटी रुपयाचा व्यवसाय केला आहे, बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल असे सांगताना स्वर्गीय शामरावआण्णा यांनी पाहिलेल स्वप्न, शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन नूतन चेअरमन मा श्री.अजय पाटील यड्रावकर यांनी पूर्ण करावे व बँकेला प्रगतीपथावर न्यावे असे आवाहन केले
यानंतर (सी. ए.) श्रावण परुळेकर व अमृता परुळेकर या उभयंतांनी सीए परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल श्री संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. आण्णासाहेब क्वाणे यांचा अनिल बागणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्रीशैल नायकुडे यांना ऑल इंडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कॉन्फरन्सच्या वतीने यंग लीडर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला, बँकेचे संचालक विशाल आवटी यांनी आभार मानले तर सूत्रसंचलन बबन यादव यांनी केले, बँकेचे अंतर्गत लेखापरीक्षक विद्यासागर बस्तवाडे यांच्यासह संचालक आशिष मुरचिटे, भरतकुमार चौगुले, धन्यकुमार पाटील- पाराज, वैभव कर्वे, प्रशांत आपिने, प्रदीप चौगुले, संजय पाटील, धन्यकुमार सिदनाळे युवराज शहा, सौ त्रिशला पाटील यड्रावकर, सौ कल्पना मोरे, सुरेंद्र जंगम शिवाजी बेडगे, मोहन प्रभावळकर तज्ञ संचालक सचिन देशिंगे, निलेश पाटील सी. ए ॲड.कुमार उपाध्ये श्रीमती सुमती पाटील यांच्यासह बँकेचे सभासद, ठेवीदार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.