गगनबावडा पांडवकालीन महादेव मंदीर येथे तब्बल १००० झाडांचा वृक्षरोपण
गगनबावडा:प्रतिनिधि
दि:१७:जुलै:गगनबावडा तालुका मांडूकली येथील नदीच्याकाठावर मशानभुमी मध्ये पांडवकालीन . मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध प्रजातीची सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली
यावेळी महादेव मंदिर भक्त व कानोबा केदारलिंग तरून मंडळाचे गगनबावडा तालुका भाजप पक्षाचे युवा नेते समाजसेवक सुरज उर्फ आबा पाटील म्हणाले पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. तर सर्व लोकांनी दर वर्षी सुमारे एक झाड तरी लावावे असे आव्हान आबा पाटिल यांनी केले
यावेळी सूरज उर्फ आबा पाटील .ह भ प वासकर फड सेवेकरी महादेव मंदिर पुजारी श्री तानाजी महाराज दत्तात्रय पाटील अंकुश खेडकर कृष्णात पडवळ बदाम पाटील महादेव पाटील सुरेश बंदरकर पिंटू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.