संभाजी भिडे यांचे सांगलीत जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, महिलांकडून औक्षण

सांगली:प्रतिनिधि

दि:०२:ऑगस्ट: वादग्रस्त विधाने केल्याबद्दल ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे आज विदर्भाच्या दौऱ्यानंतर सांगलीत दाखल झाले. सांगलीत भिडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ज्यांच्यावर गेले अनेक दिवस टीका होत असलेले आण त्या बद्दल गुन्हा दाखल झालेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गाजलेल्या विदर्भ दौऱ्यानंतर ते सांगलीमध्ये आज सायंकाळी दाखल झाले. संभाजी भिडे हे सांगलीतील त्यांच्या गावभागातील निवासस्थानी येताच शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी करत, भिडेंवर फुलांची उधळ करत महिलांनी यावेळी औक्षण केले. यावेळी धारकऱ्यांनी भारत माता कि जयच्या जोरदार घोषणा दिल्या.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.