उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर
शिरोळ:प्रतिनिधि
दि:११:ऑगस्ट: दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा लाईफ टाईम
अचिव्हमेंट ॲवॉर्ड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील
यांना जाहीर करण्यात आलेला असून सदर पुरस्काराचे वितरण दिनांक ६ सप्टेंबर, २०२३ रोजी
तिरुवअनंतपुरम (केरळ) येथे करण्यात येणार आहे. दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया च्या ८१ व्या वार्षिक परिषदेमध्ये हा पुरस्कार देण्यात येईल. साखर उद्योग आणि सलग्न संस्था यांच्या
भरभराटीसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करणे, उत्पादन क्षमता वाढविणे, दर्जेदार उत्पादन घेणे आणि
साखर उद्योगाला प्रोत्साहन देणे याकरीता ही संस्था १९२५ पासून कार्यरत आहे. भारत सरकारने या संस्थेस सांयटीफीक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता दिलेली आहे.
साखर उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल व केलेल्या कार्याची दखल घेऊन दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट
असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने सदरचा पुरस्कार यावर्षी गणपतराव पाटील यांना देण्याचा निर्णय घेतला
आहे आणि तसे संस्थेचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी कळविले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.