संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवन गौरव पुरस्कार
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:१७:ऑगस्ट: उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या 12 गौरव मूर्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. एचडीएफसी बँकेने सयाजी हॉटेल येथे या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते.शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती शाहू महाराज यावेळी बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या काळात उद्योग, व्यवसाय, शिक्षण, क्रीडा, संस्कृती या माध्यमातून कोल्हापूरचा विकास राजर्षी शाहू महाराजांनी केला.हाच वारसा आपण सर्वजण चालवत आहात. संजय घोडावत यांनी घोडावत उद्योग समूह, विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल च्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव जगात उंचावले आहे.उत्तरोत्तर कोल्हापूरचा विकास सर्वांच्या माध्यमातून होवो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संजय घोडावत म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार आपल्या मातीची सेवा केल्याबद्दल मिळत आहे,याचा खूप आनंद आहे.1994 पासून एचडीएफसी बँकेशी आपले नाते आहे.पुरस्कारामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे.याबद्दल संयोजकांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बँकेचे सर्कल हेड गौरव सिन्हा, विक्रांत नागरे, मेहुल नागदा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय डोने यांनी तर उपस्थितांचे आभार हर्षल मेहेकर यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.