डायनॅमिक स्पोर्ट्स आयोजित खो-खो स्पर्धेत जयहिंद मंडळ विजयी

इचलकरंजी :कयुम शेख 

दि २० :येथील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लब यांनी, कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या 21 वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेमध्ये जयहिंद मंडळ, इचलकरंजी या संघाने विजेतेपद प्राप्त केले. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात जयहिंद मंडळाने डायनॅमिक स्पोर्ट्सचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात इलेव्हन संघाने सी. आर. एस. एस. यू. संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.जयहिंद मंडळ व इलेव्हन संघ यांच्यामध्ये झालेला अंतिम सामना अतिशय रोमांचकारी होता. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामन्यात उत्कंठा निर्माण झाली. अखेर जयहिंद मंडळांने हा अंतिम सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले.
डायनॅमिक स्पोर्ट्सचे कार्यवाह प्रा. श्री शेखर शहा, श्री संदीप माने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. जयहिंद मंडळ, इलेव्हन संघ व तृतीय स्थानी राहिलेल्या डायनॅमिक स्पोर्ट्स या तिन्ही संघांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षक, आक्रमक, अष्टपैलू, डाईव्ह फेकणारा अशा खेळाडूंना क्रीडासाहित्य व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या गरजू दहा खेळाडूंनाही क्रीडासाहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या.याप्रसंगी डायनामिक स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री संजय कुडचे, श्री अमोल अडसुळे उर्फ भाऊ, डॉ. राहुल कुलकर्णी, बाळासाहेब काकडे, कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे श्री अमोल सुर्यवंशी, स्पर्धानिरीक्षक तात्यासाहेब कुंभोजे, प्रमोद मकोटे, राहुल गोंधळी, काशिनाथ बावडेकर, राहुल मडके, हेमंत भांडवले, योगेश माळकर, मदन बुगड, अविनाश वेदांते, इ. मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.