भव्य शोभायात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या रिल्स स्पर्धेत शरद पाटील (फोटोवाला पाटील) प्रथम
सौरभ लोखंडे, मंथन कोष्टी व योगेश शिंदे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ
इचलकरंजी –हबीब शेखदर्जी
दि २३ .आयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भव्य शोभायात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या रिल्स स्पर्धेत शरद पाटील (फोटोवाला पाटील) याने प्रथम क्रमांक पटकविला. तर सौरभ लोखंडे, मंथन कोष्टी व योगेश शिंदे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविला. या सर्वांना सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
इचलकरंजी २१ जानेवारी रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर श्री काळामारुती मंदिर ते गावभागातील रामजानकी मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेच्या निमित्ताने रिल्स स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ताराराणी पक्ष कार्यालय येथे सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, ताराराणी पक्ष शहर युवा अध्यक्ष सतीश मुळीक, विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष सुहास कांबळे, पट्टणकडोली शहर अध्यक्ष रुपेश पाटील, अनिकेत चव्हाण, राहुल घाट, फहीम पाथरवट, अरुण ऐनापुरे, रमेश पाटील, सीमा कमते, सुवर्णा लाड आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.