कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दिव्यांग बांधवाना साहित्याचे वाटप

व्हील चेअर, सायकल,अंधकाठी व इतर उपयोगी वस्तूचे वाटप

कबनूर : दिपक पाटील 

     येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दिव्यांग बांधवाना व्हील चेअर, सायकल,अंधकाठी व इतर उपयोगी साहित्याचे वाटप सरपंच शोभा पोवार,उपसरपंच सुधीरपाटील, ग्रामपंचायत सदस्या रजनी गुरव आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना उपसरपंच पाटील म्हणाले, इचलकरंजी येथील सिटु प्रणित अंध अपंग कल्याण संघाचे प्रमुख काॕ. सदा मलाबादे, कबनूर अध्यक्ष दादासो कांबळे यांनी चार दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीत येवून दिव्यांगांच्या समस्या व अडचणी मांडून विविध मागण्या केल्या होत्या. त्यास अनुसरुन जिल्हा परिषदेने कोरोना काळात प्रति दिव्यांग ८५० रुपये प्रमाणे जमा केलेले अनुदान व ग्रामपंचायत ५ टक्के अनुदानातील उर्वरीत दिव्यांगांचे अनुदान दिपावली पुर्वी देण्यात येईल. तर दिव्यांगाना मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केलेचे सांगितले. तसेच त्यांना मोफत विविध व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना शंभर टक्के नोकरीची हमी देवू असेही ते म्हणाले. यावेळी किशोर पाटील, संजय कट्टी, शिवानंद स्वामी, सुभाष पवळे, दिव्यांग बांधव आदि उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.