वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे- दिलीप आरेकर

वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे- दिलीप आरेकर* लांजात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहात वन अधिकारींचे प्रतिपादन

 

लांजा :नसिर मुजावर

दि.९-: तालुक्यातील जावडे हायस्कूल मध्ये १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान असलेल्या जागतिक वन्य जीव सप्ताह निमित्त वन विभाग लांजा व निसर्ग संवर्धन संस्था लांजा यांच्या संयुक्त विदयमाने वन्यप्राणी माहीतीपर पोस्टर प्रदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.वन्यजीव हे मानवाचे सोबती आहेत निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असून त्यांची शिकार अथवा हत्या करणे तसेच तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमात बोलताना लांजा तालुका वन अधिकारी दिलीप आरेकर यांनी जावडे येथे केले.

हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जावडे येथे जागतिक वन्य जीव सप्ताह निमित्त वन विभाग व निसर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विदयमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिन जाधव यांनी साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून त्याला मारू नका असे आवाहन करताना कोकण प्रांतात सापडणारे विषारी आणि बिनविषारी साप यांची माहीती दिली तसेच विषारी व बिनविषारी साप ओळखून त्यांचे निसर्गाच जतन केले पाहिजे त्यातच मानवाचे हित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वन विभाग लांजाचे श्री.आरेकर, सागर पाताडे, विक्रम कुंभार तसेच निसर्ग संस्थेचे सचिन जाधव, संदेश जाधव, संजोग कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, विध्देश फणसे, पांचाळ आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचा लाभ प्रशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.