सातपुते कुटुंबियांचा ६१वा शारदीय नवरात्रोत्सव

इचलकरंजी – हबीब शेखदर्जी
         येथील हभप दत्तोबा रंगोबा सातपुते मार्गावरील सातपुते कुटुंबियांचा प्रतिवर्षी साजरा होणारा विश्‍वशांती प्रित्यर्थ होणारा  शारदीय नवरात्रोत्सवास नुकताच देवांग समाजाचे अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे व उपाध्यक्ष राजेंद्र सांगले यांचे हस्ते व महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे अध्यक्षतेखाली व शंकरराव सातपुते, हभप सुभाषराव मुणगेकर यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहास सुरूवात करण्यात आली.
या सप्ताहामध्ये सकाळी सामुदायिक श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, दुपारी दुर्गा सप्तशती पाठ वाचन तर रात्रौ प्रवचन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये हभप ज्ञानेश्‍वर कडोलकर, हभप सोमनाथ लामकाने, हभप अशोकराव केसरकर, हभप अशोकराव दास या मान्यवरांची प्रवचने व महिला मंडळांचे भजन होणार आहे. तर समारोपप्रसंगी काल्याचे किर्तन व ज्ञानेश्‍वरी पारायण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शितलकुमार सातपुते व हभप अनिलराव सातपुते यांनी केले आहे. याप्रसंगी सातपुते कुटुंबिय शैलेंद्र सातपुते, राहूल सातपुते, अमोल सातपुते, अभिजीत सातपुते, सुनिल सातपुते, सौ. सुरेखा आमणे यांचेसह अनेकजण ऑफलाईन व ऑनलाईन उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.