श्री दत्त साखर कारखान्याकडून सभासदांना अपघाती विमा मदत — चार वारसांना चार लाखांचे चेक प्रदान
शिरोळ: राम आवळे
दि .१८: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ यांच्या वतीने सभासद शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या अपघाती विमा योजनेअंतर्गत नुकतेच चार सभासदांच्या वारसांना एकूण चार लाख रुपयांचे चेक प्रदान करण्यात आले.न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत घेतलेल्या या पॉलिसीमध्ये सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी शारीरिक नुकसान झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो. आतापर्यंत ९६ मृत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख प्रमाणे ९६ लाख रुपये व ३ अपंग सभासदांना प्रत्येकी ५० हजार प्रमाणे १.५ लाख रुपये, असे एकूण ९७ लाख५० हजार रुपयांचे विमा सहाय्य देण्यात आले आहे.
अपघाती मृत्यू झालेल्या सभासद व त्यांचे वारस –
1️⃣ अण्णासो सुरेंद्र हसुरे (रा. अकिवाट)
2️⃣ सुहास गुंडाप्पा कोले (रा. औरवाड)
3️⃣ सुशांत सदाशिव सूर्यवंशी (रा. अर्जुनवाड)
4️⃣ गणपती संभा माने (रा. येडूर)
या चारही सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे चेक प्रदान करण्यात आले.
प्रमुख उपस्थित मान्यवर –
🔹 दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक मा. गणपतराव पाटील दादा
🔹 चेअरमन रघुनाथ पाटील
🔹 संचालक विजय सूर्यवंशी (अर्जुनवाड)
🔹 विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील
🔹 कामगार युनियन अध्यक्ष प्रदीप उर्फ बाळू बनगे
🔹 संचालक मंडळाचे सदस्य
विमा विभाग व इतर अधिकारी –
🔸 कार्यकारी संचालक – एम. व्ही. पाटील
🔸 फायनान्स मॅनेजर – संजय भोसले
🔸 विमा सल्लागार – एकनाथ अंबाजी पाटील
🔸 क्लेम मॅनेजर, कोल्हापूर – वसंत कोल्हे
🔸 रिजनल मॅनेजर, पुणे – प्रेमचंद मोरे
🔸 उप महाप्रबंधक (DGM) – एच. बी. अरुणकुमार
🔸 वरिष्ठ सहाय्यक – रश्मी पिसाळ
🔸 ब्रांच मॅनेजर – मृणाल उरुणकर, रोहन खाडीलकर
🔸 सहाय्यक – शुभम कदम
🔸 शेअर विभाग – परवेज मेस्त्री
🔸 मंडल अधिकारी (कुंभोज) – अरुण शेट्टी
हा उपक्रम दत्त साखर कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरतो असून सभासदांच्या सुरक्षिततेसाठी हे विमा संरक्षण पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.