श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये इ.सातवी स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२ : येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इ.सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेस बसलेल्या विद्यार्थिनींसाठी शहरस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून शासनाने इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा सुरू केली आहे.यासाठी पुढील कालावधीत या स्पर्धा परीक्षेची तयारी योग्य दिशेने व गुणवत्तापूर्ण व्हावी याकरिता प्रशालेमध्ये शहरस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ विषय शिक्षक म्हणून मराठी, बुद्धिमत्ता,गणित या विषयांसाठी राजेंद्र घोडके व उमेश नाळे तसेच इंग्रजीसाठी अजित शेट्टी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस.काजी, उपमुख्याध्यापिका व्ही.एस लोटके,पर्यवेक्षक एस.एस. कोळी, पर्यवेक्षिका एन.एम.कांबळे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.नियोजन आर.एम.गरड यांनी केले. सदर कार्यशाळेस शहरातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.