व्यापारी संस्थेला 73.84 लाखाचा निव्वळ नफा : सूर्यकांत साखरे
इचलकरंजी:विजय मकोटे
दि.४: येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेला सन २०२५-२६ आर्थिक वर्षात सर्व खर्च व तरतुदी वजा जाता ७३.८४ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेची थकबाकी नाममात्र म्हणजेच शेकडा ००.८३ टक्के इतके असुन नेट एन. पी. ए. शुन्य टक्के असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे यांनी दिली.
पुढे बोलताना चेअरमन साखरे यांनी, संस्थेचे वसुल भाग भांडवल ९२.०७ लाख असुन राखीव व इतर निधी ५.७३ कोटी आहे. संस्थेच्या एकुण ठेवी २० .३९ कोटी इतके असून येणे कर्ज १६.२५ कोटी, गुंतवणुक ११.४५ कोटी इतकी आहे. गेली ४१ वर्षे संस्था इचलकरंजी परिसरातील छोट्या-मोठ्या व्यापारांचे प्रतिनिधीत्व करीत असुन अहवाल सालात संस्थेला कोल्हापुर जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी मिळाली आहे. संस्था स्थापनेपासून सतत अ वर्गात आहे. संस्थेने संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर भर दिला आहे संस्था सभासदांना सतत १३ वर्षे १५ टक्केप्रमाणे डिव्हीडंड देत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी व्हा. चेअरमन संजय वठारे, विलास गाताडे, बाळासाहेव बरगाले, दिलीप वणकुद्रे, सुभाष तोडकर, शशिकांत शेटके, विलास चव्हाण, सुभाष पाटील, नकुल झेले, आशिष पाटील, सौ. भारती शिंदे, सौ. सुवर्णा म्हेतर, अमर सडगर, धन्यकुमार पाटील, सागर मुसळे उपस्थित होते. आभार व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.