शरद इन्स्टिट्युटच्या 20 विद्यार्थ्यांची अॅटॉस ग्लोबल व क्वालिटी किऑस्कमध्ये निवड

यड्राव : प्रतिनिधी
              दि17 नोव्हेंबर  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 20 विद्यार्थ्यांची अॅटॉस ग्लोबल आयटी सोल्युशन व क्वालिटी किऑस्क या नामांकित कंपनीत निवड झाली. अॅटॉस ग्लोबल कंपनीत इलेक्ट्रॉनिक्समधील वीरश्री पाटील, पल्लवी टिपगडे, अमृता चौगुले, श्वेता गायकवड, हमीद शेख, श्रुती कवठेकर, अक्षता बेडगे कॉम्प्युटरमधील श्रेया कुलकर्णी, श्रीराम पाटील, यश तोडकर, स्नेहल चव्हाण यांची निवड झाली आहे. क्वालिटी किऑस्क कंपनीत इलेक्ट्रॉनिक्समधील मिनल गुरव व कॉम्प्युटरमधील साकीब सदुले, दर्शन पाटील, देवेंद्र तांबे, ऋषीकेश ऐनापुरे, यश तोडकर, सुप्रभात खोत, प्रसाद कांबळे, आनंद सावंत यांची निवड झाली आहे.
            अॅटॉस ग्लोबल ही कंपनी 73 देशात काम करीत असून  बँकींग आणि फायन्सियल सर्व्हीसेस, हेल्थकेअर, लाईफ सायन्स, इन्शुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, लॉजिस्टीक आणि ट्रॅव्हल, टेलिकॉम, मेडिया टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील उद्योगामध्ये प्रोडक्ट इंजिनिअरिंग, मायक्रोसर्व्हिसेस, कन्टींन्युअस टेस्टींग, सायबर सिक्युरिटी, इंटरप्रइज प्लॅटफॉर्म सोल्युशन या सेवा देते.
क्वालिटी किऑस्क कंपनी 25 देशात गेल्या 18 वर्षापासून बँकींग, फायन्सियल सर्व्हिस, इन्शुरन्स क्षेत्रात काम करते. देशातील सर्व प्रमुख बँकेसह अनेक कंपन्यासाठी काम करते.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग अंतर्गत सुरू असलेल्या अॅक्टीव्हिटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव करून घेण्यात आला आहे. तसेच जापनिज, फ्रेंच, पायथॉन, सी अशा विविध भाषांचे प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.