मणेरे शिक्षण संकुलनात.डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
कबनूर ; हबीब शेखदर्जी
दि 6 डिसेंबर श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विदया मंदिर, मणेरे हायस्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि. ६/१२/२०२१ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुभाष केटकाळे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. धनगर एस.डी. यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राथमिकच्या उपमुख्याध्यापिका सौ.ऐनापुरे.पी.बी, बालवाडी प्रमुख सौ. ढेकळे एस.एस. तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.