Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
रत्नागिरी : महेरूनिसा साखरतर
दि. ६ : रत्नागिरीतील धनश्री कलेक्शन या व्हॉट्स अप ग्रुपच्या महिला उद्योजिका नी एकत्र येऊन दुकान चालू करण्याची ही पहिलीच वेळ आपल्या जिल्हयात असावी आणि त्यांचे कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आज तुम्ही सुरू केलेली ही लहान शॉपी भविष्यात लवकरच मोठी जागा घेऊन मोठा मॉल स्थापन कराल यात तिळमात्र शंका मला वाटत नाही असे गौरवोद्गार श्री शॉपीच्या उद्घाटक, रत्नागिरी ग्राहक पेठच्या निर्माणकर्त्या व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्राचीताई शिंदे यांनी या उदघाटन प्रसंगी काढले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या समर्थ एक्झॉटीका नर्सरीच्या मालक, प्रसिद्ध डायेटिशन सौ. कोमल संतोष तावडे यांनी या प्रसंगी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. एकत्र मिळून बिझीनेस करताना आणि ते ही महिला एकत्र येवून काम करताना अनेक लोक आपले पाय मागे खेचण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपला बिझनेस कसा वाढेल, ग्राहकाला खुष कसे कराल? त्यांना सेवा देताना आपले वर्तन कसे असावे या बद्दल अनेक उत्तमोत्तम टीप्स कोमल तावडे यांनी दिल्या. तुम्ही तयार करत असलेल्या मालाचा दर्जा कधी घसरू देवू नका किंवा त्यात कधी तडजोडही करू नका असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. ग्राहकाला सर्व सेवा या एका छताखाली मिळतील असा प्रयत्न तुमच्याकडून केला जाईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा मोलाचा सल्ला त्यांनी शुभेच्छांसह दिला. पुढील वेळी मोठा मॉल स्थापन कराल तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत असू असे आश्वासनही त्यांनी दिले.
२०१९ साली स्थापन केलेल्या धनश्री कलेक्शन या खाजगी वापरासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे व्यापारी ग्रुप म्हणून ओळख निर्माण झाली आणि अल्पावधीत अनेक बेरोजगार महिलांना घरबसल्या रोजगाराचे साधन निर्माण झाले. आजपर्यंत या ग्रुपचे ४ ग्रुप तयार झाले असून त्यातील वीस उद्योजक महिलांनी धाडसाचे एक पाऊल पुढे टाकले आहे आणि अभ्युदयनगर परिसरात श्री शॉपी या गृहउद्योगाच्या दालनाचे उदघाटन केले आहे. यात ग्राहकांना गाऊन्स, साडी, ड्रेस मटेरिअल, लाडू, चिवडा, सांडगे, मिरची, आनंदी पॅड, होममेड साबण, करवंटीपासून वस्तू, फ्रोजन चिकन, फ्रोजन व्हेज, रेडी टू ईट पदार्थ, बाळंत विडे, सगळ्या प्रकारची पिठे, नारळ, मातीची भांडी, स्वेटर्स, काचेच्या बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, सरबते, आगळ, सोलापूरी चादरी, टॉवेल्स, रूमाल, उदबत्ती, धूप, अत्तर, सेंट मटेरिअल, मेहंदी आदी वस्तू मिळणार आहेत. मसाले,
श्री शॉपी या नवीन उपक्रमाला रत्नागिरीकरांनी आवश्यक भेट द्यावी असे आव्हान महिला उद्योजकांनी केले आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.