सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवस, मराठी शाळांमध्ये वही ,पेन भेट देण्याचा ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा’ संकल्प..
संगमेश्वर:-मुजीब खान
छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष सुनिल धावडे उद्या म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२२ रोजी आपला ३५ वा वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारशिंगे शाळेमध्ये छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने मोफत वही ,पेन देण्याचा संकल्प छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी याप्रसंगी केलेला आहे.
या कार्यक्रमाबद्दल माहिती देत आपले मत सांगत असताना प्रतिष्ठान चे मुख्य सचिव समीर गोताड यांनी असे म्हटले आहे की, “सुनिल धावडेसाहेब हे सध्याच्या समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांना सर्व क्षेत्रातील उत्तम जाण आहे हे आपणा सर्वांना अवगत आहे अशा कार्यक्रमामुळे सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते आणि म्हणूनच आपल्या मराठी शाळेमधील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होवून प्रगल्भ आणि सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते. याकरिता नारशिंगे मध्ये छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा हा छोटासा प्रयत्न आहे”, असं मत प्रतिष्ठान चे मुख्य सचिव समिर गोताड यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.