स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन
शिरोळ : विजय घंगेकर
दि: १३ फेब्रुवारी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे-दत्तवाडकर सरकार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास संचालक ॲडव्होकेट प्रमोद वसंत पाटील यांनी, स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पासगोंडा पाटील यांनी व स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास निमंत्रीत संचालक दरगु गोपाळ मानेगावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थित संचालक व इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, डिस्टीलरी मॅनेजर एस.के.यादव, गेस्टहाऊस इनचार्ज शक्तीजित गुरव, सॅनिटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, सुरक्षा अधिकारी एस.व्ही. घारगे,सिव्हील इंजिनियर यशवंत माने, हेड टाईम किपर आर.एम.केरीपाळे, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही.आर.इंगळे व इतर खातेप्रमुख व कर्मचारीवर्ग यांचेसह शिरोळ नगरपरिषदेचे नगरसेवक तातोबा पाटील तसेच शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी व दत्त भांडारचे पदाधिकारी यांचेसह सभासद उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.