श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 51 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १८ एप्रिल कोरोना महामारीच्या काळातही सभासद, ठेवीदार, हितचिंतक त्याचबरोबर सर्व संचालक, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे  श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 लाख रुपयांचा नफा मिळविला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.
ते म्हणाले, बसवेश्‍वर पत संस्थेने संस्थापक कै. ज्ञानबा बसाप्पा दत्तवाडे यांचे विचार आणि दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमण करीत असून सातत्याने यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे. ठेवीदार आणि सभासदांनी टाकलेल्या विश्‍वासाला ती पात्र ठरली आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्वांनाच विविध संकटांचा सामना करावा लागला. मात्र पत संस्थेचे ठेवीदार, कर्जदार व सभासद यांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि संचालक व कर्मचार्‍यांच्या पाठबळामुळे संस्थेने प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे. संस्थेचे वसुल भागभांडवल 53 लाख 71 हजार इतके असून 2 कोटी 22 लाख 29 हजार इतका फंड आहे. 11 कोटी 30 लाख 54 हजाराच्या ठेवी असून 6 कोटी 32 लाख 42 हजार इतकी गुंतवणूक आहे. कर्जे 7 कोटी 43 लाख 92 हजार इतकी असून निव्वळ एनपीए 2.79 टक्के इतका आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात सर्व तरतूदी वजा करता पत संस्थेला 51 लाख 1 हजार रुपये इतका नफा झाला असल्याचे सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब देवनाळ, संचालक सर्वश्री मलगोंडा पाटील, अशोक चनविरे, वैभव हावळे, संदीप तोडकर, हर्षल माने, चंद्रकांत माळी, दत्तात्रय कुंभोजे, सौ. सुरेखा दत्तवाडे, श्रीमती सरस्वती माळी, निवृत्ती गलगले व सेक्रेटरी बंडू माळी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.