नियोजित हातकणंगले- इचलकरंजी रेल्वे मार्ग रद्द करा

रेल्वे विरोधी कृती समितीचे रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांना निवेदन

कबनूर : चंदुलाल फकीर

दि. १८ जून नियोजित हातकणंगले -इचलकरंजी ८ कि.मी.चा रेल्वे मार्ग रद्द करून सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा असे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्षना जरदोष यांना इचलकरंजी रेल्वे मार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री जरदोष यांनी निवेदन स्वीकारून याबाबत विचार केला जाईल अशी ग्वाही दिली.कबनूर चौकात राज्यमंत्री यांना निवेदन दिले.
निवेदनात हा रेल्वेमार्ग इचलकरंजी, कबनूर, कोरोची, रुई, चंदुर, हातकणंगले येथील शेतीतून जात असल्यामुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त होणार आहे.सुपीक जमिनी,पाणी पुरवठा योजना व नागरी वस्ती अशा अनेक घटकांना धोका निर्माण होणार आहे. नवीन पर्यायी मार्ग रेल्वे विरोधी कृती समितीने निदर्शनास आणून दिला आहे. सुचवलेल्या परिसरात रेल्वेस्थानक केल्यास इचलकरंजीसह आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहती,टेक्सटाईल पार्क,लोटस पार्क,प्राईड इंडिया या औद्योगिक वसाहतींना जोडले जाऊ शकते. त्यामुळे दळणवळणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. या बाबींचा विचार करून हा आठ किलोमीटरचा नियोजित रेल्वे मार्ग रुद्ध करावा व कृती समितीने सुचवलेल्या पर्यायाचा विचार करावा असे नमूद केले आहे. यावेळी पंचांग कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, जेष्ठ नेते जयकुमार कोले,सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, प्रमोद पाटील,
महादेव पाटील, अमोल पाटील, पांडुरंग वाकरेकर, आप्पासाहेब पाटील,बबन केटकाळे, दशरथ पिष्टे, प्रमोद पाटील, धुळगोंडा पाटील,महावीर लिगाडे,जावेद इनामदार, दादा पाटील, शिवगोंडा पाटील, शरद पाटील, बी. एस.पाटील, दादासो लिगाडे,सचिन वाकरेकर,अरुण एकसंबे,  सदस्य रोहिणी स्वामी, रजनी गुरव, अर्चना पाटील यांच्यासह कबनूर, चंदूर,कोरोची परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.