आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूल, ( सी बी एस ई) इ.१० वी चा १००% निकाल

जयसिंगपूर : प्रतिनिधी

दि. २३ जुलै :आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलचा ( सी बी एस ई ) इ.10 वी चा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला. सी बी एस ई  दिल्ली बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.

     या परीक्षेत कु.ऋषिता कदम ही ९६.८०% गुण मिळवून प्रथम आली. कु.दिशा चौगुले ९६.००% गुण मिळवून द्वितीय तर अथर्व ठोंबरे ९४.००% गुण मिळवून तृतीय, श्रेया पाटोळे ९३.६०% गुण मिळवून चतुर्थ, जय माळी ९२.८०% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने तर ९२.४०% गुण मिळवून मानसी गवळी सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ६ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त तर ४ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त आणि ६ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.

                            कु. ऋषिता कदम हिने १०० गुणांपैकी इंग्रजीमध्ये १००, सायन्समध्ये ९९, गणितामध्ये ९७ तर IT मध्ये ९९ गुण प्राप्त केले. हिंदीमध्ये दिशा चौगुले हिने १०० पैकी १०० तर अथर्व ठोंबरे याने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले.

            या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्रिन्सिपल श्री अजय फरांडे, को-ओर्डीनेटर वैशाली पाटील तसेच सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेचे चेअरमन मा.श्री आण्णासाहेब चकोते, सेक्रेटरी बाळासाहेब चकोते, सतीश चकोते, प्रज्ञा चकोते यांचे प्रोत्साहन मिळाले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये पालकांचे बहुमोल योगदान मिळाले आहे.

  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे श्री आण्णासाहेब चकोते यांनी खास अभिनंदन केले. प्रशालेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल परिसरातील सर्व मान्यवर, पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आणि सर्वांना उज्ज्वल भाविष्यासाठी शुभेच्या दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.