‘इंडो किड्स ‘ची तिरंगा जनजागृती फेरी उत्साहात

कबनूर : दिपक पाटील

दि. . १२ ऑगस्ट :भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी देशासाठी केलेल्या कर्तृत्वाची ज्योत सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी तर्फे इंडो किड्स इंग्लिश हायस्कूल पासून रत्नाप्पा कुंभार चौक व परत शाळेपर्यंत तिरंगा जनजागृती फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाला


हिंदुस्तान महाराष्ट्र शासनाचे 20 कमांडर विद्यार्थी विद्यार्थिनी संचालन करत भारत माता की जय “75 वा स्वातंत्र्य दिनाचा विजय असो” ” हर घर तिरंगा ;घर घर तिरंगा” हा जयघोष करत जनजागृती फेरीला सुरुवात झाली ती रत्नाप्पा कुंभार चौकामध्ये हिंदुस्तान महाराष्ट्र शासन स्काऊटचे कमांडर श्री. मोहसीन शेख यांच्या हस्ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. तसेच क्रांतिवीर निजामुद्दीन काझी व स्वातंत्र्य लढ्यात शहीद व सहभागी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 22 हुतात्मे यांच्या पवित्र फलकाचे अनावरण कबनूर चे ज्येष्ठ नेते माननीय श्री जयकुमार कोले यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी वीर पत्नी अशरफ जी काझी ,संस्थेचे चेअरमन श्री. एन. एन. काझी मैनुद्दीन काझी ,श्री .अशोक पाटील, प्रमोद पाटील मिलिंद अलताब जकाते यांची उपस्थित होती. घोषणांनी सर्व परिसर देशमय झाला होता .
75 वा अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा फेरीमध्ये 75 तिरंगे व दीडशे फुटाचा भव्य तिरंगा घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी ,”हरघर तिरंगा” देशभक्तीपर घोषणांनी सर्व परिसर देशभक्ती मय केला .संपूर्ण गावभर फेरी निघताना परिसरातील लोक तिरंगा फेरी पाहून भारावून जाऊन छायाचित्रण केले.
शाळेच्या सेक्रेटरी समीरा पिरजादे मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.