नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपा कार्यालयाच्या वतने सत्कार..
इचलकरंजी :प्रतीनिधी
दि .१ जानेवारी :चलकरंजी विधानसभा मतदार संघातील तारदाळ, कोरोची, खोतवाडी ग्रामपंचाय येथील नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार मा.जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल देसाई शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीने इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील तारदाळ, कोरोची, खोतवाडी या ग्रामपंचायतमध्ये नेत्रदीपक असे यश मिळविले. तारदाळयेथील नूतन सरपंच सौ.पल्लवी पवार, खोतवाडी येथील नूतन सरपंच विशाल कुभार आणि सदस्य यांचा सत्कार या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल देसाई, शहराध्यक्ष अनिल डाळ्या, जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजू या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यता आला. यावेळी सरपंच व सदस्यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या मध्यमातून सर्वसामान्य लोकांन पर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिकपणे करावे. तसेच भारतीय जनता पार्टीच काम, ध्येय, विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावे. तसेच राज्यात सत्ता असलेने तीन्ही ग्रामपंचायतील सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांनी दिले. या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभारी म्हणून कोरोची शशिकांत मोहिते, मनोज हिंगमिरे, तारदाळला सुनील महाजन,किसन शिंदे तर खोतवाडीमध्ये सतिश पंडित, मनोज साळुंखे, अरविंद शर्मा यांनी काम पाहीले.
यावेळी सर्व नवनिर्वाचित तारदाळ लोकनियुक्त सरपंच सौ.पल्लवी पोवार, ग्रामपंचायत सदस्य अकबर करडी, सौ.दिपाली कोराणे, सौ.राणी शिंदे, सौ.पाटील संगिता, पाटील प्रविण, पाटील मृत्युंजय, कोळी सुरज, सौ. पोवार विमल, सौ. माने राणी, सौ. दाते सुवर्णा तसेच खोतवडी लोकनियुक्त सरपंच विशाल कुभार, नरेंद्र पोटे, राहुल कांबळे, श्रीमती निर्मला खोत, सावता माने, देवकी शिंदे, सुजाता स्वामी, सौ. शिल्पा पवार, अजय डूबल, गजानन नलगे, माधुरी सुतार, कोरोची ग्रामपंचायत सदस्य तृणाल कुंभार, आनंदा लोहार, सौ. अश्विनी चव्हाण, आनंदी आमते, अध्यक्ष सनी ओऊळकर, मा.ग्राम पं.सदस्य सचिन पवळे, रमेश पाटील, सुनील गावडे, तारदाळचे अध्यक्ष सतिश नर्मदे, सचिन पवार, खोतवडीचे अध्यक्ष दगडू खोत,मा.सरपंच संजय चोपडे, शंकर पाटील,आदि मान्यवर उपस्थित होते.
.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.