संजय गांधी निराधार योजना मधील जुन्या लाभार्थ्यांना ATM कार्ड चे त्वरित वाटप करावे

राहुल खंजिरे यांची मा.हसन मुश्रीफ यांचेकडे मागणी

इचलकरंजी:विजय मकोटे 
दि .३ जानेवारी येथील संजय गांधी निराधार योजनेमधील के .डी.सी.सी . बँकेमध्ये  सुमारे २००००  लाभार्थी पेन्शन घेत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात सन २०२१ नंतर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पोष्टामार्फत घरपोच पेन्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने जुन्या लाभार्थ्यांना सुद्धा  ए .टी .एम . कार्ड मार्फत पेन्शन वाटप  करणेचा जनहिताचा निर्णय के .डी.सी.सी  बँकेचे चेअरमन व तत्कालिन ग्राम विकास मंत्री मा.हसन मुश्रीफ यांनी घेतला होता.
 गेली कित्येक वर्षे इचलकरंजी परिसरातील संजय गांधी निराधार योजनेचे  लाभार्थी के .डी.सी.सी बँकेमधून पेन्शन घेत आहेत.कोरोना काळात सुद्धा  के .डी.सी.सी बँके मार्फत पेन्शन वाटप सुरु होते. सदर लाभार्थी जास्त संख्येने  तसेच अपंग लाभार्थ्यांचे प्रमाण मोठे असलेने जुन्या  लाभार्थ्यांना के .डी.सी.सी बँकेमार्फत पेन्शन मिळताना होणारी गैरसोय दूर होण्या करिता संजय गांधी निराधार योजना समितीचे तत्कालीन अध्यक्ष श्री.राहुल खंजिरे यांनी  सदर लाभार्थ्यांना विनात्रास पेन्शन मिळणेसाठी ए .टी .एम . द्वारे वाटप करणेची मागणी केली होती. याबाबत सकारात्मक भूमिका  घेऊन सदर लाभार्थ्यांना ए .टी .एम . कार्ड देण्याचा निर्णय मा.हसन मुश्रीफ  यांनी घेतला आहे. सदर ए .टी .एम . कार्ड द्वारे लाभार्थ्यांना कोणत्याही ए .टी .एम . सेंटर मधून पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासकीय पातळीवर अद्याप त्याविषयी कोणतीही कार्यवाही झाली नाही.
तरी याबाबत ए .टी .एम . कार्ड वाटणेसाठी गावभाग व मेन शाखा इचलकरंजी येथे विशेष कार्यालय सुरु करून  संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना ए .टी .एम . कार्ड वाटप करणेत यावे. अशी मागणी संजय गांधी निराधार योजना समिती चे तत्कालीन अध्यक्ष श्री.राहुल खंजिरे यांनी मा.हसन मुश्रीफ यांचेकडे केली. त्यावर याबाबत के .डी.सी.सी बँकेचे एम .डी  श्री.ए.बी.माने यांना याबाबत त्वरित प्रक्रिया पूर्ण करणेचे आदेश मा.हसन मुश्रीफ यांनी दिले.सदर जनहितकारी योजना राबविलेबद्दल संजय गांधी निराधार योजनेच्या माजी सदस्यांच्या वतीने मा. हसन मुश्रीफ यांचा सत्कार करणेत आला. यावेळी श्री.अमित गाताडे, सचिन कांबळे, सुदाम साळुंखे आदि उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.