वडिलांच्या निधनानंतर बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली

एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवणार

­चंद्रपूर­:प्रतिनिधि

दि:२८:काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्यात येणार आहे     

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने हलवले जाणार आहे. विशेष म्हणजे कालच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे अत्यसंस्कार करण्यात आले आहे.

वडिलांचं निधन

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांच्यावर आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी भद्रावती येथे अत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळपासूनच बाळू धानोरकर यांना अस्वस्त वाटत होतं. त्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.