मणेरे हायस्कूल पालक मेळावा

कबनूर:हबीब शेखदर्जी

दि २०:श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल इचलकरंजी इयत्ता 10 वीचा पालक मेळावा संपन्न झाला.  या पालक मेळाव्यास संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकरराव मणेरे अध्यक्षस्थानी होते. त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे ट्रस्टी मा.श्री.शितलकुमार मणेरे मा.श्री.अनिलकुमार मणेरे ,मार्गदर्शक मा.श्री.अशोक वसगडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या कार्यक्रमात मार्गदर्शनपर भाषणात मा.श्री. अशोक वसगडे सर यांनी “विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुवतीनुसार अभ्यास करावा, दुसऱ्याचे अनुकरण करु नये अशा उपदेशपर सूचना केल्या. त्याचप्रमाणे हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे यांनी परीक्षेबद्दलच्या सर्व सूचना व पालकांनी पाल्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात मा.श्री.सुधाकरराव मणेरे यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेवून परीक्षा पार पाडावी व यश प्राप्त करुन शाळेचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ.प्रतिभा बावचे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर निवडीविषयी मार्गदर्शन केले. पालकांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

या पालक मेळाव्याचे सूत्रसंचलन सौ.सुधा शिलेदार व आभार सौ.सुमन पाटील यांनी  केले.

या पालक मेळाव्यास हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.