पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता
कोल्हापूर,प्रतिनिधी
दि.20: : स्वच्छता मोहिमेअंतर्गत (डीप क्लीनिंग) कोल्हापूर शहरातील सर्व मंदिर परिसर व मुख्य रस्त्यांच्या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. डीप क्लीनिंग मोहिमे अंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनीही मंदिर परिसराची साफसफाई केली.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेवून त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत या परिसराची स्वच्छता केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव तथा उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी नगरसेवक जयंत पाटील, आदिल फरास, विनायक फाळके, प्रकाश पाटील, रमेश पोवार, मुरलीधर जाधव, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.